Menu Close

गांधीनगर (गुजरात) येथील गरबा उत्सवात सहभागी होणार्‍यांचे गोमूत्र शिंपडून आणि टिळा लावून स्वागत

लव्ह जिहाद रोखण्याचा प्रयत्न

कर्णावती : गांधीनगर येथे आयोजित थनगनाट गरबा महोत्सवामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून गरब्यामध्ये सहभागी होणार्‍या लोकांवर गोमूत्र शिंपडून आणि टिळा लावून मंडपात सोडण्यात येत आहे. धर्मांध, हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी हिंदू असल्याचे भासवून गरब्यामध्ये सहभागी होत असल्याचे समोर आले असल्यामुळे अशा प्रकारची उपाययोजना हिंदु संघटनांकडून केली जात आहे. (धर्मांध त्यांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी या गोष्टीही स्वीकारतील. त्यामुळे हिंदु संघटनांनी हिंदूंना विशेषतः मुलींना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्माविषयी अभिमान निर्माण करायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. बजरंग दलाचे कार्यकर्ते सूर्यप्रकाश वैष्णव यांनी सांगितले की, ‘आम्ही गांधीनगर आणि आजूबाजूच्या भागात लव्ह जिहादच्या विरोधात महिलांना जागरूक करण्याचे कार्य करत आहोत. गोमूत्र शिंपडणे आणि टिळा लावणे या कृतींमधून महिलांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण होईल.’

२. थनगनाट गरब्याचे आयोजक संदीप जोशी म्हणाले की, बजरंग दलाकडून आम्हाला याविषयी आधीच कल्पना देण्यात आली होती आणि यात काहीच चुकीचे नाही.

३. गरब्यामध्ये सहभागी झालेल्या साक्षी परमार यांनी सांगितले की, गोमूत्राचा वापर करणे ही आमची प्राचीन परंपरा आहे आणि त्याचा आम्हाला काहीच त्रास नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *