वाहनचालक धर्मांधावर गुन्हा प्रविष्ट
कराड (जिल्हा सातारा) : येथे कत्तलीसाठी नेत असलेल्या २२ गोवंशियांची धर्मांधांच्या तावडीतून ‘हिंदू एकता आंदोलन’च्या कार्यकर्त्यांनी सुटका केली. येथील पुणे-बेंगळुरू महामार्गावर २१ सप्टेंबरला सकाळी ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश आणि वाहन कह्यात घेतले. धर्मांध वाहन चालक जावेद मिठेसाहेब पटेल याच्यावर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
१. हिंदू एकता आंदोलनाचे श्री. सूरज पाटील आणि श्री. आकाश कणसे कोल्हापूरला जात असतांना नांदलापूर फाट्याच्या ठिकाणी एका वाहनात गोवंश असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वाहन रोखले, तेव्हा त्यात गायीची १३ वासरे (कालवडी) आणि म्हशीची ९ वासरे (रेडकू) असल्याचे आढळले. एक वासरू गतप्राण झाले होते.
२. त्यांनी धर्मांध चालक जावेद मिठेसाहेब पटेल याला विचारल्यावर तो गोवंशियांना पशूवधगृहाकडे नेत असल्याचे उघड झाले. त्या दोघांनी धर्मांध चालकासह वाहन पोलीस ठाण्यात आणले. हिंदू एकता आंदोलनाचे मार्गदर्शक श्री. अजय पावसकर यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. (असे जागृत धर्माभिमानी हीच हिंदु धर्माची खरी शक्ती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात