श्रीदुर्गामाता दौडीचा तिसरा दिवस
सांगली : संत तुकाराम महाराज म्हणतात की, मी जिकडे पाहीन, तिकडे मला पांडुरंगच दिसत आहे. सर्व दिशांना मला पांडुरंगाचेच रूप दिसते. आपल्यालाही सर्वत्र श्रीदुर्गामाता दिसायला हवी. हिंदुस्थान हे राष्ट्र म्हणून उभे राहिले पाहिजे, यांसाठीच आपली धडपड-प्रयत्न असले पाहिजेत. या राष्ट्रातील प्रत्येक बांधव आपल्याला आपला वाटला पाहिजे. ही दृष्टी म्हणजेच हिंदुत्व, राष्ट्रीयत्व होय !
श्रीशिवछत्रपतींना ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्याचा ध्यास लागला होता, तसा ध्यास आपल्याला लागला पाहिजे, असे मागणे आपण श्रीदुर्गामातेकडे मागितले पाहिजे, असे मार्गदर्शन पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी केले.
ते माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्रीदुर्गामाता मंदिरासमोर तिसर्या दिवशी श्रीदुर्गामाता दौडीत धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात