Menu Close

धर्मकार्य वेगाने वाढवा, मी तुमच्या सोबत आहे – राजासिंह ठाकूर

भाग्यनगर (तेलंगण) येथील हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

श्री. राजासिंह ठाकूर

भाग्यनगर : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेनेच इतके मोठे धर्मकार्य होत आहे. आम्ही भाग्यवान आहोत की, आम्हाला येथे धर्मकार्य करण्याची संधी मिळत आहे. आम्ही हिंदूंनी धर्मकार्य करण्यासाठी अधिक वेळ दिला पाहिजे. संघटित होऊन वेगाने कार्य वाढवा, मी तुमच्या सोबत आहे, असे प्रतिपादन धर्माभिमानी आमदार श्री. राजासिंह ठाकूर यांनी केले. येथील शामबाबा मंदिराच्या सभागृहात दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेचा भाग्यनगर, आदिलाबाद, अदोनी, इंदूर (निझामाबाद) आर्मूर, विशाखापट्टनम्, गुंटूर आणि हिंदुपुरा येथील धर्मप्रेमींनी लाभ घेतला.

कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे घोषणा देतांना धर्मप्रेमी

कार्यशाळेचा उद्देश समितीचे श्री. चेतन जनार्दन यांनी सांगितला. मनुष्य जीवनात साधनेचे महत्त्व आणि गुरुकृपायोगानुसार साधना याविषयी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. चेतन राजहंस आणि सौ. विनुता शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. स्वभावदोष निर्मूलन आणि अहंनिर्मूलन यांविषयी श्री. चेतन जनार्दन आणि सौ. विनुता शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या उपक्रमांविषयी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे आणि श्री. चेतन जनार्दन यांनी माहिती दिली.

क्षणचित्रे

१. एका धर्मप्रेमीने ‘माझे घर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यासाठी वापरू शकतो’, असे सांगितले, तसेच ‘कन्नड भाषेतून तेलगु भाषेत करावयाच्या ग्रंथ भाषांतरासाठी अधिक वेळ देईन’, असेही सांगितले.

२. एका धर्माभिमान्याने सांगितले की, समितीचे कार्यकर्ते आमच्यासाठी आदर्श आहेत. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन धर्मासाठी समर्पित केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *