कानो (नायजेरिया) : उत्तर नायजेरियातील दोन गावांत बोको हरामच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले. त्या भागातील सतर्कता समितीच्या सदस्यांनी ही माहिती दिली.
नायजेरियात बोको हराम ही जिहादी संघटना सक्रिय आहे. या संघटनेला बऱ्याच प्रमाणात नेस्तनाबूत करण्यात आल्याचा दावा अध्यक्ष मुहंमद बुहारी यांनी केला होता. त्यामुळे त्यांचा दावा किती पोकळ आहे, हे त्यातून दिसून येते. बोको हराम कट्टरवाद्यांशी लढा देणाऱ्या सरकारी लष्कराला स्थानिक सतर्कता समिती मदत करते. या समितीचे सदस्य मुस्तफा करीम बे यांनी सांगितले की, बंदूकधारी हल्लेखोर दुचाकी आणि अन्य वाहनांतून आले होते.
संदर्भ : लोकमत