- भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत, असे म्हणणार्यांना म्यानमारमधील असुरक्षित हिंदू दिसत नाहीत का ?
- हिंदूंना ठार करणार्या रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना भारतात आश्रय का द्यायचा ? रोहिंग्यांना आश्रय देण्याची मागणी करणार्यांना सरकारने रोहिंग्यांसहित देशातून हद्दपार करून हिंदूंचे रक्षण केले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नेपितो (म्यानमार) : रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने राखिन प्रांतात २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड घडवल्याची माहिती म्यानमारच्या सैन्याने दिली आहे. या हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह मोठ्या खड्ड्यात गाडण्यात आले होते. हे ठिकाण सैन्याने शोधून काढले आहे. ही घटना ऑगस्टमध्ये झाल्याची शक्यता सैन्याने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्यापासून राखिन प्रांतात चालू असलेल्या हिंसाचारामुळे येथील सहस्रो हिंदूंनी स्थलांतर केले आहे. या हिंसाचारात या भागात रहात असलेले अनुमाने ३० सहस्र हिंदू आणि बौद्ध नागरिकही विस्थापित झाले आहेत. यापूर्वी रोहिंग्या आतंकवाद्यांनी ८८ हिंदूंची हत्या केल्याची माहिती समोर आली होती.
‘रोहिंग्या मुसलमानांच्या नरसंहारासाठी म्यानमार दोषी !’ – इंटरनॅशनल पीपल्स ट्रिब्यूनल
इंटरनॅशनल पीपल्स ट्रिब्यूनलने काश्मीरमधील हिंदूंसाठी कधीच कोणता निर्णय दिला नाही कि त्याची चौकशी केली नाही; मात्र अन्य धर्मियांवरील अत्याचाराच्या वेळी हा लवाद लगेच सक्रीय होतो, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कुआलालंपूर (मलेशिया) : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या नरसंहाराला म्यानमार दोषी आहे. अजूनही हा नरसंहार चालू आहे. तो रोखला गेला नाही, तर भविष्यात मरणार्यांच्या संख्येत वाढ होऊ शकते, असा निर्णय आंतरराष्ट्रीय पीपल्स ट्रिब्यूनलने दिला आहे. म्यानमारचे सैन्य सुनियोजितरित्या मुसलमानांना लक्ष्य करत आहे. ट्रिब्यूनलच्या ७ सदस्यांच्या पिठाने हा निर्णय दिला आहे.
कुआलालंपूर येथे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत या लवादाने म्यानमारमधून पलायन केलेल्या रोहिंग्या मुसलमानांचे जबाब नोंदवून घेतल्यावर वरील निर्णय दिला. लवादाचा हा निर्णय संयुक्त राष्ट्र आणि अन्य आंतरराष्ट्रीय संस्था यांना पाठवण्यात येणार आहे. त्यातून त्यांनी म्यानमारमधील हिंसाचार समाप्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात