कोझीकोडे (केरळ) : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची (पीएफ्आयची) सहयोगी संस्था नॅशनल वूमन फ्रंट (एनडब्ल्यूएफ्) हिने येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात पीएफ्आयचे प्रदेशाध्यक्ष ई. अबूबकर आणि एन्डब्ल्यूएफ्चे अध्यक्ष ए.एस्. जैनबा हेही सहभागी झाले होते. पीएफ्आयवर आतंकवादी कारवाया केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला पुरावे मिळाले असून तिच्यावर बंदी घालण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्रालय करत आहे. भाजपने या प्रकरणी अन्सारी यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष पी. रघुनाथ यांनी निवेदन प्रसिद्धी दिले आहे. यात ते म्हणाले, ‘‘१० वर्षे भारताच्या उपराष्ट्रपती पदावर असलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या रडारवर असलेल्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमात जाणे चुकीचे आहे.’’ भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष पी. प्रकाशबाबू यांनी केरळ सरकार अशा कार्यक्रमांच्या आयोजनाला प्रोत्साहन देत आहे, असा आरोप केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात