पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर डीजे चालू
अन्य धर्मियांच्या मिरवणुकीत पोलिसांनी असा प्रकार करण्याचे धैर्य केले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
यवतमाळ : शहरातील दुर्गा स्थापना मिरवणुकीतील सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाचा डीजे वडगाव रोड पोलिसांनी बंद करून कह्यात घेतल्याने मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या ठिकाणी जाऊन त्यांना याविषयी सांगितले. (प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सण-उत्सवांमध्ये निर्बंध का घातले जातात, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी डीजे चालू करण्यास सांगितले.
या वेळी डीजेवर बंदी नसतांना पोलिसांची कारवाई का, पोलिसांच्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डीजे कसा वाजतो, असे प्रश्न उपस्थित करत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात