धर्म विज्ञान शोध संस्थेच्या संंशोधकांचा दावा
उज्जैन : परमाणु अणुुभट्टी आणि शिवपिंड यांच्यात साम्य आहे. शिवपिंडीवर अधिक प्रमाणात ‘रेडिएशन्स’ (लहरी) असतात. या लहरींच्या प्रभावाचा भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी शिवपिंडीवर सतत पाण्याची धार चालू ठेवण्यात येते, तसेच पूजेच्या वेळी रुईची फुले आणि बेलाची पाने वाहण्यात येतात, जे परमाणु ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे शिवपिंडीला हानी पोहचण्याचा कोणताही धोका रहात नाही, असा दावा धर्म विज्ञान शोध संस्थेच्या संंशोधकांनी संशोधनाअंती केला आहे.
धर्म आणि विज्ञान यांविषयी संशोधन करणार्या ‘धर्म विज्ञान शोध संस्थे’ने शिवपिंडीवर वाहण्यात येणार्या पदार्थाचे गुणधर्म आणि त्यांच्यात आढळून येणारे तत्त्व यांच्या शास्त्रीय व्याख्येच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे. या संशोधनानुसार पंचाक्षरी मंत्र आणि महामृत्यूंजय मंत्र यांची आवृत्ती पूजासाहित्याचे (फूले, दूध, दही आदींचे) विखंडन करते. त्यानंतर त्याचे सूक्ष्मऊर्जेत रूपांतर होऊन ते औषधीत रुपांतरित होते. शिवपिंडीवर सतत पडणारी औषधी आणि पाण्याची धार यांमुळे परमाणु विखंडनाच्या ऊर्जेतून आपोआप उपचार होत रहातात.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण आणि पुरातत् व विभागाच्या चमूने महाकाल मंदिरात जाऊन तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गाभार्यात शिवपिंडीवर वाहण्यात येणार्या फुलांच्या माळांवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या माळा वाहण्यास भक्तांना बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर हे संशोधन करण्यात आले.
संस्थेचे ज्येष्ठ धर्मसंशोधक डॉ. जे. जोशी यांनी ‘रुईची फुले, बेलपत्र आदींपासून शिवपिंडीला कोणताही धोका नाही’, असे म्हटले आहे. धर्म संशोधक श्री. वैभव जोशी यांच्यानुसार दूध, दही, मध यांमुळे शिवपिंडीवर कवच निर्माण होते. विज्ञान महाविद्यालयाचे भूशास्त्र विभागाचे माजी विभागाध्यक्ष डॉ. आर्.एन्. तिवारी यांच्या मते, शिवपिंडीवर वाहण्यात येणार्या साहित्याची चाचणी ‘मानक’ स्तरावरील प्रयोगशाळेत झाली, तरच हे प्रमाणित समजण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात