थायलंड हा देश धर्मनिरपेक्ष असून तेथे हिंदू अल्पसंख्य आहेत. असे असतांना त्या सरकारने श्री गणेशाचे टपाल तिकीट प्रसिद्ध केले. भारतात हिंदू बहुसंख्य असूनही येथील धर्मनिरपेक्षता मात्र हिंदू देवतांना अस्पृश्य समजते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बँकॉक : थायलंडमध्ये श्री गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीचे चित्र असलेल्या टपाल तिकिटाचे पर्यटनमंत्री श्रीमती कोबकर्ण वट्टानवरान्ग्कुल यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
थायलंडमध्ये ८ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गणेशचतुर्थी साजरी करण्यात आली. सहस्रो भक्तांनी श्री गणेशाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी गणेशमूर्तींचे विसर्जन थायलंडचे राजे महा वजीरालोंगकोर्न यांच्या हस्ते करण्यात आले. या उत्सवाला स्थानिक प्रसारमाध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. हे कार्यक्रम विश्व हिंदु परिषद आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आयोजित केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात