पुणे : स्त्रिया त्याग भावनेने काम करत असतात. त्यांच्यातील आपलेपणाच्या भावनेमुळे त्या कुटुंबाला बांधून ठेवतात. ही आपलेपणाची भावना आणि स्त्रियांनी केलेले संस्कार यांमुळेच सुसंस्कृत समाज निर्माण होईल, असे प्रतिपादन भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केले. भवानी प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘स्त्री शक्ती सन्मान जागर’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तेव्हा त्या बोलत होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात