हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन
पुणे : रोहिंग्या मुसलमानांचा देशाच्या सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन अवैधरित्या भारतात घुसलेल्या रोहिंग्या मुसलमानांची त्वरित हकालपट्टी करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना देण्यात आले. या वेळी मुठे यांनी या निवेदनाची प्रत गृहविभागाला पाठवण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. ‘विश्वभरात ५२ हून अधिक इस्लामी राष्ट्र असतांना त्या ठिकाणी आश्रय न घेता रोहिंग्या भारतात घुसले आहेत. भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘१९५१ चा रिफ्युजी रिटर्न अॅक्ट’वर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे भारतात आलेले रोहिंग्या मुसलमान अवैध म्हणजे घुसखोर ठरतात. त्यांचा आतंकवादी कारवायांमध्ये असलेला सहभाग पहाता रोहिंग्या घुसखोरांना भारताबाहेर हाकलण्यात यावे’, असे निवेदनात म्हटले आहे.
‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘का बॉडी स्केप्स’ चित्रपटाला अनुमती देऊ नये’, ‘डॉ. झाकीर नाईक आणि त्याची बंदी घातलेली इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संस्था यांचे फेसबूक खाते त्वरित बंद करावे’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या यांमागील षड्यंत्राचे केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात यावे’, ‘नागपूर मेट्रोच्या डब्यांची निर्मिती करण्यासाठी चिनी आस्थापनाला दिलेले कंत्राट त्वरित रहित करावे, या मागण्यांचीही निवेदनेही मुठे यांना देण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात