हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
पुणे : किल्ले सिंहगडाच्या डागडुजीच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून दुरुस्तीचे बांधकामही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या संदर्भात सीओईपीने अहवाल सादर करूनही त्याची नोंद घेण्यात आली नाही. खोटेनाटे आकडे दाखवून तेथील टाक्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात तेवढी त्या टाक्यांची क्षमताच नाही. सिंहगडाची निकृष्ट दर्जाची बांधकाम-दुरुस्ती करणारा कंत्राटदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. या प्रसंगी ‘शिवछत्रपतींचा सिंहगड भ्रष्टाचारापासून वाचवा’ या मोहिमेचे समन्वयक श्री. प्रवीण नाईक आणि श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते. या वेळी कायद्याच्या चौकटीप्रमाणे आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन राव यांनी दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात