Menu Close

बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये आणखी १७ हिंदूंचे मृतदेह सापडले

  • रोहिंग्या मुसलमानांना आश्रय देण्यासाठी देशातील धर्मांध मोर्चे काढतात; मात्र रोहिंग्यांकडून हिंदूंना ठार  करण्यात आले, याचा विरोध करण्यासाठी एकही हिंदुत्वनिष्ठ संघटना आंदोलन करत नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
  • एकीकडे स्वतःला असाहाय्य, पीडित म्हणून जगाला दाखवायचे आणि दुसरीकडे हिंदूंवर अत्याचार करायचे, हे रोहिंग्यांचे खरे स्वरूप आहे, हे त्यांच्यासाठी अश्रू ढाळणारे आणि न्यायालयात याचिका करणारे अधिवक्ता प्रशांत भूषणसारखे भारतातील पुरो(अधो)गामी जाणतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून खड्ड्यात गाडल्याचे समोर आले होते. आता तेथे आणखी १७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांनाही रोहिंग्या मुसलमानांनी मारल्याचे म्यानमारच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे. एकीकडे हे उघड होत असतांना निर्वासित म्हणून बांगलादेशच्या कॉक्सबाजार जिल्ह्यातील कोटुपलाँग येथील छावण्यांमध्ये रहात असलेल्या रोहिंग्याकडून तेथे रहाणार्‍या निर्वासित हिंदूंवर धार्मिक अत्याचार करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. येथे हिंदु महिलांचे धर्मांतर केले जात आहे. त्यांना ५ वेळा नमाज पठण करण्यास भाग पाडले जात आहे, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.

पूजा(नावावरून)ची रबिया झालेल्या हिंदु महिलेचे अनुभव

पूजा(नावावरून)ची रबिया बनलेल्या हिंदु महिलेने सांगितले की, येथील छावण्यांमध्ये रोहिंग्या मुसलमानांकडून हिंदु महिलांचे बळजोरीने धर्मांतर केले जात आहे. आम्ही म्यानमारमधून स्वतःला वाचवण्यासाठी येथे पळून आलो होतो; मात्र येथे उलटच घडत आहे. आमची स्थिती आणखी वाईट झाली आहे. ऑगस्टमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या हिंसाचारात माझ्या पतीचा मृत्यू झाला. त्यांना रोहिंग्या आतंकवाद्यांनी ठार केले. चेहरा लपवून आलेले रोहिंग्या आतंकवादी हिंदु धर्माला शिव्या देत होते. त्यांनी पती आणि कुटुंबातील अन्य व्यक्तींना ठार केले आणि माझे अपहरण केले. त्यांनी मला जंगलात नेले आणि मला नमाज पठण करण्यास लावले. ‘जर जिवंत रहायचे असेल, तर धर्मांतर करावे लागेल’, असे त्यांनी धमकावले. मला बुरखा घालण्यास सांगण्यात आले. तसेच ३ आठवडे इस्लामी रितीरिवाज शिकवण्यात आले. मला ‘अल्ला’ बोलण्यास सांगण्यात आले; पण माझे हृदय देवासाठीच धडकत होते.’

सुंदर आणि तरुण हिंदु तरुणींचे अपहरण

रबियाप्रमाणे आणखी काही महिलांचे धर्मांतर करण्यात आले आहे. यात रिका धर हिला सादिया बनवण्यात आले आहे. रिका हिने सांगितले की, २५ ऑगस्टला आतंकवादी आमच्या घरात घुसले आणि त्यांनी आमच्याकडील सर्व सोने काढून घेतले. त्यांनी आम्हाला मारहाण केली. त्यांनी सर्व हिंदूंना एकत्र करून तेथील टेकडीवर नेले. त्यांनी हिंदूंना एका रांगेत उभे करून ठार केले. केवळ माझ्यासहित ८ हिंदु महिलांना ज्या तरुण आणि सुंदर होत्या त्यांना मारले नाही. त्यांनी आम्हाला ‘धर्मांतर करून आमच्याशी लग्न करा’ असे सांगितले. आमच्याकडे अन्य पर्याय नव्हता. आम्ही त्यांच्यासोबत गेलो. त्यांनी आम्हाला जंगलात नेऊन सोडले. आमच्या नातेवाइकांनी आम्हाला शोधले आणि येथे आणले.

पुरुषांचेही धर्मांतर करण्याचा प्रयत्न

महिलांप्रमाणेच हिंदु पुरुषांनाही धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात येत आहे. विजय राम पाल या निर्वासित हिंदु तरुणाने सांगितले की, आम्हालाही महिलांप्रमाणे धर्मांतरासाठी धमकावण्यात येत आहे.

सर्व धर्मियांसाठी वेगवेगळ्या छावण्या करू ! – बांगलादेशचे माहितीमंत्री

बांगलादेशचे माहिती खात्याचे मंत्री हसनुल हक इनू यांनी या संदर्भात सांगितले की, आम्ही याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू. आम्ही प्रत्येक धर्मियांसाठी वेगळ्या छावण्या बनवू.

धर्मांतराची चौकशी करू ! – उपायुक्त

छावण्यांमध्ये हिंदूंचे धर्मांतर होत असल्याच्या संदर्भात बांगलादेशच्या कॉक्सबाजाराचे उपायुक्त महंमद अली हुसेन यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, आम्हाला याविषयी काहीच माहिती नाही. जर हे सत्य असेल, तर आम्ही त्यावर कारवाई करू. (भारतातील पोलिसांप्रमाणेच असणारे बांगलादेशचे पोलीस ! – संपादक,दैनिक सनातन प्रभात)

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांचा नरसंहार होत असल्याचा आरोप चुकीचा ! – म्यानमार

संयुक्त राष्ट्रे : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांचा नरसंहार झालेला नाही. आम्ही अशा प्रकारचा नरसंहार होत असेल, तर तो रोखण्यासाठी प्रयत्न करू, असे उत्तर म्यानमारचे संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी हाऊ डो सुआन यांनी महासभेत दिले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांना या प्रश्‍नाकडे तटस्थपणे आणि निष्पक्षपणे पहाण्याचे आवाहन केले.

रोहिंग्या मुसलमानांना भारतात आश्रय द्या ! – भाजपचे खासदार वरुण गांधी यांची मागणी

वरुण गांधी भाजपचे कि काँग्रसचे ? रोहिंग्यांचे क्रौर्य वरुण गांधी यांना माहीत नाही का ? -संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी ‘नवभारत टाइम्स’ या वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात रोहिंग्या मुसलमानांना शरणार्थी म्हणून भारतात राहू दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. आतिथ्य आणि शरण देण्याच्या परंपरेचे पालन करत रोहिंग्यांना शरण देणे यापुढेही जारी ठेवले पाहिजे, असे त्यांनी यात म्हटले आहे. या लेखावर प्रतिक्रिया देतांना भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. ‘कोणत्याही देशभक्ताला असे वाटू शकत नाही. जो देशभक्त असेल तो देशाच्या हिताचा विचार करेल. तो अशा प्रकारचे वक्तव्य कधीच करू शकत नाही’, असे अहिर यांनी म्हटले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *