प्रत्येक सूत्राला बुद्धीच्या कसोटीवर तपासणारे बुद्धीप्रामाण्यावादी अशा वृत्तांवर कधी बोलत नाहीत हे लक्षात घ्या !
महाबलीपूरम (तामिळनाडू) : चेन्नई येथून ६० किलोमीटर अंतरावर महाबलीपूरम हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. याच्याजवळ एका टेकडीच्या कड्यावर २० फूट उंच, १६ फूट रुंद आणि २५० टन वजनाचा अजस्र असा गोल दगड आहे. यालाच श्रीकृष्णाच्या लोण्याचा गोळा या नावाने ओळखले जाते. हा दगड सुमारे १ सहस्र २०० वर्षांपासून तेथे असल्याचे समजले जाते.
१. प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला हा दगड केवळ ४ फूट परिसराच्या जागेवर टेकडीच्या कडावर स्थिरावला आहे.
२. एवढ्या वर्षांत त्याची झीज झाली नाही कि तो खाली घरंगळला नाही.
३. हा दगड कसा उभा आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या एक आश्चर्यच समजले जाते. २५० टन वजनाचा दगड केवळ ४ फूट आकाराच्या पायावर कसा काय उभा राहू शकतो, याविषयी सर्वांना कुतुहूल आहे.
४. वर्ष १९०८ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताचे राज्यपाल (गव्हर्नर) आर्थर लॉली यांनी ७ हत्ती वापरून हा दगड हलवण्याचे असफल प्रयत्न केले होते.
५. असाच प्रयत्न पल्लव वंशातील नरसिंह वर्मन राजानेही केला होता; मात्र त्याचा उद्देश या दगडाला शिल्पकारांनी हात लावू नये, असा होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात