जबलपूर येथे हिंदु धर्म सेनेकडून विशाल हिंदु सभेचे आयोजन
जबलपूर (मध्यप्रदेश) : जगभरात शौर्यवान समाज म्हणून ओळखल्या जाणार्या हिंदु समाजाला मागील ७० वर्षांत शौयहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. त्यामुळे आज हिंदुबहुल देशात हिंदूंच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हिंदूंनी आज राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अन् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी महिषासूरमर्दिनी दुर्गादेवीचा आदर्श समोर ठेवून शौर्यजागरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केले. नवरात्रच्या निमित्ताने हिंदु धर्म सेनेने आयोजित केलेल्या या सभेला विश्व हिंदु परिषदेच्या डॉ. साध्वी प्राची, भरत रक्षा मंचाचे श्री. सूर्यकांत केळकर, इंद्रभान तिवारी महाराज, हिंदु धर्म सेनचे प्रमुख श्री. योगेश अग्रवाल यांनी संबोधित केले.
रोहिंग्याना भारतात घुसू देणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई व्हावी ! – साध्वी डॉ. प्राची, विश्व हिंदु परिषद
रोहिंग्या आतंकवादी आहेत, त्यांचे देशात रहाणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. त्यांना या भारतमातेच्या पवित्र भूमीवर स्थान मिळू नये, असा संकल्प आम्ही या नवरात्रीला केला पाहिजे, तसेच कोणतीही पडताळणी न करता या आतंकवादी रोहिंग्यांना देशात घुसू देणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आपण पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात