सोलापूर येथे दांडिया स्पर्धेमध्ये रणरागिणी शाखेचे व्याख्यान
सोलापूर : मुलींची असुरक्षितता वाढली आहे. भारतामध्ये प्रती १५ मिनिटाला हिंदु मुलीवर बलात्कार होतो. आतापर्यंत एकदाही मुसलमान युवतीवर बलात्कार झाल्याचे ऐकिवात नाही. सोलापूर येथे ‘लव्ह जिहाद’ची आतापर्यंत १ सहस्र ३५० प्रकरणे घडलेली आहेत. दुसर्या धर्मात जाऊ नको, हे सांगण्यासाठी प्रबोधन करावे लागते. ते हिंदु धर्मासाठी लज्जास्पद आहे. ‘जोधा अकबर’ हा चित्रपटही ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देणारा आहे आणि आपण तो पैसे व्यय करून बघायला जातो. सर्वच पालकांनी आपल्या मुलांना धर्मशिक्षण दिल्यास ‘लव्ह जिहाद’सारख्या भयंकर संकटाचा सामना आपण निश्चितच करू शकतो, असे प्रतिपादन रणरागिणी शाखेच्या सौ. अलका व्हनमारे यांनी केले. येथे श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, पूजा मंडळ आणि युवती प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्त आयोजित केलेल्या दांडिया स्पर्धा कार्यक्रमात ‘लव्ह जिहाद’ या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी ‘स्वसंरक्षणाची आवश्यकता’ विशद करणार्या ‘हिंदु तेजा जाग रे’ या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित महिलांनी नाटिका आवडल्याचे सांगितले.
वैशिष्ट्यपूर्ण
१. महिलांनी प्रशिक्षणवर्गाची मागणी केली.
२. ‘एवढा महत्त्वाचा विषय आतापर्यंत आम्हाला कोणीच सांगितला नाही. व्याख्यान पुष्कळ चांगले झाले. आमच्या मुलींचे रक्षण होण्यासाठी, तसेच त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी प्रयत्न करू’, असे महिलांनी सांगितले.
३. श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज, पूजा मंडळ आणि युवती प्रतिष्ठान यांनी हा विषय मांडण्यासाठी रणरागिणी शाखेला स्वत:हून निमंत्रित केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात