Menu Close

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

तणाव न्यून करण्यासाठी हरितक्षेत्राची आवश्यकता !

  • विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणारे शासनकर्ते, बांधकाम व्यावसायिक, कारखानदार आदींना आतातरी निसर्गाचे महत्त्व लक्षात येईल, अशी अपेक्षा !
  • निसर्गाचे महत्त्व समजून त्यानुसार धार्मिक परंपरा, प्रथा आणि सण साजरा करणारा हिंदु धर्म किती महान आहे, हे पुरोगामी आणि निधर्मीवादी आतातरी समजून घेतील का ?
  • भारताची प्रगती नाही, तर अधोगती होत आहे, हे शहरीकरणातून उघड होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

लंडन : जगात सर्वाधिक तणावग्रस्त २० शहरांपैकी ४ भारतीय शहरे आहेत. यात नवी देहली जगात ९ व्या क्रमांकाचे तणावग्रस्त शहर ठरले आहे, तर मुंबई १३ व्या, कोलकाता १९ व्या आणि बेंगळुरू २० व्या क्रमांकावर आहे. जगात पहिल्या क्रमांकाचा तणावग्रस्त शहर म्हणून इराकची राजधानी बगदादचे नाव आहे, तर सर्वांत कमी ताण-तणाव असलेल्या शहरात जर्मनीचे स्टुटगार्ट शहर पहिल्या स्थानी आहे. जगात सर्वाधिक तणावग्रस्त आणि सर्वांत अल्प ताण असलेले शहर कोणते याविषयी नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते त्यातून ही माहिती समोर आली आहे.

या सर्वेक्षणासाठी शहरांची सूची बनवण्यासाठी ५०० शहरांचा अभ्यास करण्यात आला. यात १७ विषय होते. त्यामध्ये मानसिक शांतता, अधिकोषातील बचत आणि नोकरीची हमी इत्यादींचा समावेश होता. त्यामध्ये जर्मनी एकूणच सर्वात चांगले राष्ट्र ठरले आहे. पहिल्या १० सर्वात अल्प ताण असलेल्या शहरांत जर्मनीतील ४ शहरे आहेत, तर सिडनी हे एकमेव शहर आहे जे युरोपियन नाही.

सर्वेक्षणात स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, शहरात तणाव न्यून करण्यासाठी हरित पट्टा आणि झाडांची संख्या अधिक असणे आवश्यक आहे. त्यातही आर्थिक स्थैर्य आणि वैयक्तिक सुरक्षिततेची भावनासुद्धा महत्त्वाची आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *