Menu Close

नवरात्रोत्सवात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिलेल्या फुग्यांची विक्री

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शत्रूराष्ट्राचे गुणगान करणार्‍या फुग्यांची विक्री केली जाणे, हे सरकारला लज्जास्पद ! या पाकप्रेमींवर कारवाई करण्यासाठी सरकार कठोर पाऊल उचलणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

गोंदिया : नवरात्रोत्सवात गोंदियामध्ये पाकिस्तानचे समर्थनाचे लिखाण असणार्‍या फुग्यांची विक्री होत असल्याचे लक्षात आले आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे फुगे पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत.

गोंदिया शहरातील विविध दुर्गा मंडपाजवळ लहान मुले फुगे विकतांना आढळले. (आता पाकिस्तानचा प्रसार करण्यासाठी लहान मुलांचा वापर होत असल्याचे हे या घटनेतून लक्षात येते. पाक समर्थकांची ही खेळी पोलिसांनी हाणून पाडणे आवश्यक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या फुग्यांवर ‘पाकिस्तान आय लव्ह यू, पाकिस्तान झिंदाबाद’ असे इंग्रजीत लिखाण असून काही लिखाण उर्दूतून केले आहे. या वेळी त्यांच्या जवळील सर्व फुगे हे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत घेतले आणि ते गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलांची विचारपूस करून सोडण्यात आले. गोंदिया शहर पोलिसांनी शहरातील फुगे व्यापार्‍यांना बोलावून फुगे विक्री करत असतांना ते पडताळून पहाण्याचे आदेश दिले आहेत. ‘अशा पद्धतीचे फुगे विक्री करतांना कोणी आढळून आल्यास कारवाई करू’, अशा सूचना पोलिसांनी व्यापार्‍यांना दिल्या आहेत.

गोंदीयांतील फुगे व्यापार्‍यांकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांकडून पडताळणी चालू

गोंदीयातील गांधीनगरचे ठाणेदार मनोहर दाभाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार गोंदिया येथील फुगे व्यापारी रामचंद्र बेलानी यांनी मुंबईच्या मिरची बाजार येथून फुग्यांचे पाकीट २५ दिवसांपूर्वी गोंदियात आणले होते. पोलिसांची त्या दिशेने पडताळणी चालू आहे. बेलानी यांनी फुग्यांची ५० पाकिटे आणली होती. त्यातील ४० पाकिटे त्यांनी रजतकुमार छोतलानी यांना विकली होती. त्यानंतर छोतलानी यांनी ही पाकिटे दौलत मेघांनी यांना विकली. मेघांनी यांनी नवरात्रोत्सवात फुगे विकले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *