Menu Close

फेसबूकवर हिंदूंच्या देवतांविषयी गलिच्छ लिखाण पोस्ट करणार्‍या डॉ. प्रांजल चौरे यांच्या विरोधात रत्नागिरीत गुन्हा प्रविष्ट

  • सामाजिक प्रसारमाध्यमांवर जाणीवपूर्वक हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या पोस्ट टाकून धार्मिक तेढ निमार्र्ण करण्याचा हिंदुद्वेषींचा प्रयत्न !

  • कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन ! – राकेश नलावडे, जिल्हाध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

रत्नागिरी : येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवेंद्र झापडेकर यांच्या फेसबूक अकाऊंटवर डॉ. प्रांजल चौरे यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकली आहे. त्यामुळे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात डॉ. चौरे यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली होती. भा.दं.वि. १५३(अ), २९५(अ), ३४ अन्वये शहर पोलीस ठाण्यात डॉ. चौरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. राकेश नलावडे, धारकरी सर्वश्री गणेश गायकवाड, सुशील कदम, कौस्तुभ सावंत, दिलीप देवरूखकर, रत्नागिरी जिल्हा संघचालक श्री. आनंद तथा नाना मराठे, प्रवीण साठे, रवींद्र भुवड, साप्ताहिक रंगयात्रीचे रूपेश चवंडे, अधिवक्ता विद्यानंद जोग आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी उपस्थित होते.

महिन्यापूर्वीच नितीन मोहिते याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक पोस्ट फेसबूकवर टाकली होती. त्यानंतर लगेचच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने तीव्र विरोध करून गुन्हा प्रविष्ट करायला लावला होता. याचा परिणाम मोहिते याला नालासोपारा येथे अटक करण्यात आली होती.

आताही ऐन नवरात्रोत्सवात मूळचे रत्नागिरी येथील रहिवासी असलेले; मात्र आता नागपूर येथे होमिओपॅथीचा व्यवसाय करत असलेले डॉ. प्रांजल चौरे यांनी श्री दुर्गामाता, हिंदूंच्या देवता, ब्राह्मण यांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण फेसबूकवर पोस्ट केले आहे. या लिखाणाचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून तीव्र निषेध करण्यात आला असून डॉ. प्रांजल चौरे यांच्यावर योग्य ती कडक कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी परखड चेतावणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री. राकेश नलावडे यांनी दिली आहे.

डॉ. चौरे यांनी पोस्ट केलेले अवमानकारक लिखाण

पाकिस्तानमध्ये ईशनिंदा करणार्‍यांना कायद्याने फाशीची शिक्षा ठोठावली जाते आता भारतातही हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी, असा कायदा सरकारने करावा, हिच हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

१. दुर्गा कोण आहे ??? एक वेश्या

२. महिषासुर कोण आहे ??? एक मूळनिवासी राजा

३. दुर्गामूर्ती बनवण्यासाठी बंगालमध्ये वेश्येच्या घरून माती आणावी लागते !

४. कोणी असा माणूस पाहिला आहे का ? ज्याचे ८ हात आहेत. ३ मान आहेत.

५. अर्धे शरीर मानवाचे आणि अर्धे शरीर प्राण्याचे, मान हत्तीची, इत्यादी

या व्यतिरिक्त देवता आणि ब्राह्मण यांच्याविषयीही गलिच्छ लिखाणाची पोस्ट टाकण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *