धनबाद भारतात आहे कि पाकिस्तानात ? देशात हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांच्या विरोधात शासन कारवाई करील, अशी आशा आहे !
गावात मंदिर बांधल्याचा सूड उगवला
- धनबादमध्ये मालडाची पुनरावृत्ती
- मंदिरातील मूर्तींची तोडफोड
- हिंदूंच्या घरांवर आक्रमण
- महिला आणि मुले यांना मारहाण
- महिलांचा विनयभंग
- घटनेकडे प्रसारमाध्यमांकडून अक्षम्य दुर्लक्ष
धनबाद (झारखंड) : देशात मुसलमानबहुल गावांमध्ये रहाणे हिंदूंना दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. धनबाद जिल्ह्यातील नवाटांड या गावामध्ये ५०० हून अधिक धर्मांधांनी येथील हिंदूंवर आक्रमण केल्याचे नुकतेच समोर आले आहे. या आक्रमणात धर्मांधांनी मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली, तसेच हिंदूंच्या घरांवरही आक्रमण केले आणि महिलांसह मुलांना मारहाण केली. जातांना त्यांनी २४ घंट्यांत गाव सोडा किंवा मरण्यास सिद्ध रहा, अशी धमकीही दिली. या आक्रमणात १० हिंदु गंभीररित्या घायाळ झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. एवढी मोठी घटना घडूनही गेला १ मास या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये साधी वाच्यताही करण्यात आलेली नाही.
१. नवाटांड या गावात मुसलमानांची ३००, तर हिंदूंची केवळ २० कुटुंबे रहातात. गावात कोणतेही मंदिर नसल्याने हिंदूंनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या खाजगी जागेत एक मंदिर बांधले. यास मुसलमानांचा विरोध होता.
२. १६ जानेवारी या दिवशी गावातील ग्रामस्थ या मंदिरासमोर सायंकाळची आरती करत होते. तेव्हा परिसरातील वस्त्यांमधून अल्ला ओ अकबरच्या घोषणा देत शेकडो धर्मांध आले आणि त्यांनी हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात काही लोक पळून गेले; मात्र जे धर्मांधांच्या तावडीत सापडले त्यांना मारहाण करण्यात आली.
३. या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ जीतू महातो यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांकडून १७ लोकांना अटक करण्यात आली; मात्र मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहे. या घटनेला बंगालमधील मालडाची पुनरावृत्ती मानण्यात येत आहे.
४. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तरुण हिंदू या हिंदुत्ववादी संघटनेच्या नेतृत्वाखाली पोलीस आणि प्रशासन यांच्या विरोधात २६ जानेवारी या दिवशी धनबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले अन् दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. यानंतर तरुण हिंदू संघटनेचे अध्यक्ष डॉ. एन्.एम्. दास यांच्या नेतृत्वाखाली शासनाला संबंधितांवर कारवाई करण्याविषयी निवेदन देण्यात आले.
५. या घटनेविषयी एखादा अपवाद वगळता एकाही वृत्तपत्राने वृत्त छापण्याचे कष्ट घेतले नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात