भुसावळ (जिल्हा जळगाव) : बाजीराव-मस्तानी चित्रपटात केलेले इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासनाने राज्यातील चर्चमध्ये शासकीय खर्चाने ख्रिसमस साजरा करण्याचा घेतलेला निर्णय यांविरोधात भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन पार पडले. येथील अष्टभुजा देवी मंदिराजवळ १४ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आंदोलन झाले.
या वेळी सर्वश्री अधिवक्ता मनीषकुमार वर्मा, हिरामण वाघ, शशिकांत सुरवडकर, विकास साबळे, विलास चौधरी, उमेश जोशी, यशवंत पाटील आणि हितेश टकले उपस्थित होते. आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात