Menu Close

लव्ह जिहादचा विषय आम्ही निश्‍चित पुढे नेऊ ! – भारत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी

लव्ह जिहाद रोखण्यासाठी सातारा येथे उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

सातारा : लव्ह जिहादविषयी समाजामध्ये जागृती झाली पाहिजे. आम्ही निश्‍चित हा विषय पुढे नेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी म्हटले. लव्ह जिहाद रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी, तसेच बंगालमध्ये मोहरमनिमित्त लादण्यात आलेली श्री दुर्गामूर्तींच्या विसर्जनावरील बंदी हटवावी, यासाठी येथील निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी याप्रसंगी लव्ह जिहादची दाहकता स्पष्ट केली. या वेळी माजी नगरसेविका सौ. लीलावती निंबाळकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *