पलूस (जिल्हा सांगली) : महिला जेव्हा समाजात जातात, तेव्हा समाजातील वाईट प्रवृत्तींच्या विरोधात त्यांना तोंड द्यावे लागते. अशांच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम शरीर आणि मन आवश्यक आहे. यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. शर्वरी रेपाळ यांनी केले. जय हनुमान नवरात्र मंडळाच्या वतीने आयोजित शौर्य जागरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम पलूस येथील व्यंकटेश मंदिर येथे २७ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत पार पडला.
या कार्यक्रमासाठी ४० युवती-महिला आणि १० युवक उपस्थित होते. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकेही दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन सौ. दीपा निकम आणि सौ. उषा चव्हाण यांनी केले. ‘असे कार्यक्रम वरचेवर आयोजित व्हावेत’, असे मत महिलांनी या वेळी व्यक्त केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात