Menu Close

म्यानमारमधून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ३ रोहिंग्यांसह चौघांना बांगलादेशमध्ये अटक

आतंकवादी कारवायाच नव्हे, तर गुन्हेगारीही करणार्‍या रोहिंग्यांना भारतात आश्रय का म्हणून द्यायचा ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

ढाका : बांगलादेशच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या गोळ्यांच्या तस्करीच्या प्रकरणी ३ रोहिंग्या मुसलमान आणि एक बांगलादेशी नागरिक यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख याबा टॅब्लेटस् (मेथम्फेटामाइन) जप्त करण्यात आले आहेत.

नाफा नदीजवळून त्यांना अटक करण्यात आली. म्यानमार आणि बांगलादेश यांच्या सीमेवरून ही नदी वाहते. गेल्या आठवड्यात येथून २ रोहिंग्यांना अशाच तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली होती. म्यानमारच्या सीमेजवळील गावांमध्ये या गोळ्या बनवल्या जातात, अशी माहिती बांगलादेशच्या सैन्याधिकार्‍याने दिली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *