मिरज दंगल कोणी घडवली हे सर्वज्ञात असतांना केवळ हिंदुद्वेषापोटी राजेंद्र कुंभार यांचे विधान
सातारा : मिरज दंगल ही घडवून आणली होती. दंगलीच्या क्लिप्स् इचलकरंजी येथे सिद्ध करण्यात आल्या. हे सर्व तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी उजेडात आणले. कृष्णप्रकाश यांच्यावरील सूड उगवण्यासाठी मनोहर उपाख्य संभाजीराव भिडेनी लोकांची डोकी भडकवली आणि प्रताप टॉकीजजवळची पोलीस चौकी जाळून टाकली, असा आरोप प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केला. (मिरज शहरात शिवसेनेच्या अफझलखानाच्या वधाच्या कमानीवर आक्षेप घेत धर्मांधांनी त्यावर दगडफेक करून ती फाडली होती. त्याचसमवेत धर्मांध इम्रान नदाफ याने ऐन गणेशोत्सवात श्री गणेशमूर्तीवर दगडफेक करून मूर्ती फोडल्या, तसेच एका धर्मांधाने कृष्णप्रकाश यांच्या गाडीवर हिरवा झेंडा फडकवला. त्या वेळी याला अटकाव करण्याऐवजी तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश शांत राहिले. यामुळेच दंगल भडकली. हे सर्वज्ञात असतांना त्यावर कोणतेही भाष्य न करता केवळ हिंदुद्वेषापोटीच राजेंद्र कुंभार हे ऋषीतुल्य पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्यावर वृथा आरोप करत आहेत. प्रत्यक्षात घडलेली घटना आणि वस्तुस्थिती वेगळी असतांना जाणीवपूर्व विद्यार्थ्यांची दिशाभूल करणारे विधान केल्याविषयी वास्तविक पोलीस प्रशासनाने जातीयवादी राजेंद्र कुंभार यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. ज्यांचे मन हिंदुद्वेषाने ग्रासले आहे, असे लोक विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी कार्यशाळेत स्वातंत्र्य, लोकशाही आणि घटना याविषयावर ते बोलत होते.
डॉ. राजेंद्र कुंभार पुढे म्हणाले की…
१. या देशात विचारस्वातंत्र्याचा प्रथम बळी महात्मा गांधी यांचा आहे. गांधी म्हणायचे मी कट्टर हिंदु आहे आणि हिंदु धर्माला विषमता मान्य नाही. दाभोलकरांच्या प्रश्नांना उत्तरे देणे अवघड होते. (दाभोलकरांना अनेकांनी आव्हान दिले होते तेव्हा त्यांनी पळ काढला होता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. धार्मिक सर्व ढोंगी आहेत. लोक यज्ञात तूप ओततात. हे सर्व धार्मिक गुलामगिरीतून होते. (आणि धर्म न मानणारे सज्जन आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माने कधीही अनैतिकतेला बंधन घातलेले नाही. (हास्यास्पद विधाने करणारे कुंभार ! आज भारतात संपूर्ण जगापेक्षा अधिक नैतिकता आहे आणि ती केवळ नागरिकांच्या धर्माचरणामुळे आहे. धर्माचरणानेच संयम, नैतिकता, बंधने पाळण्यासाठी मनुष्याला बळ मिळते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) नैतिकता परमेश्वराकडून आलेली नाही. धर्माकडून आलेली नाही. ऋषी-मुनींकडून तर आजिबात आलेली नाही. उदाहरणार्थ विश्वामित्र ऋषी आणि मेनका. (विश्वामित्र ऋषींचा अधिकार काय होता, याची माहिती नसणारे अज्ञानी कुंभार ! ऋषि हा शब्द उच्चारण्याचीही पात्रता नसणार्यांनी ऋषिमुनींविषयी न बोललेलेच बरे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. वेद वाचल्यावर मला मूर्खपणा वाटला. (अमेरिकेसह सारे जग आज वेदांतील ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे, हे अज्ञानी कुंभार यांना माहीत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पुराणातले देव आपल्या देव्हार्यात आहेत का ? नाही. हिंदु धर्मच अस्तित्वात नाही. ब्रह्मा, विष्णु, इंद्र आदी देवांची मंदिरे आहेत का ? नाहीत. (युगानुसार त्या त्या देवतांच्या मंदिरांची निर्मिती होत असत, हे ज्ञान असण्यासाठी अध्यात्माचा अभ्यास असावा लागतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हे देव आहेत असे सांगून आपल्याला मानसिक आणि धार्मिक गुलामगिरीत ठेवण्यात आले आहे. (अशी गुलामगिरी असती, तर कुंभार एवढे बरळू शकले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ग्रहांचा मनुष्य जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. फलज्योेतिष हे तर थोतांड आहे. (ज्या विषयांचा काडीचाही अभ्यास नाही, त्यावर बोलू नये, हा साधा नियमही ज्ञात नसणारे कुंभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. छत्रपती शिवाजी महाराज हे विशिष्ट धर्माचे नव्हते. (छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा झेंडा भगवा होता, तसेच ते स्वत:ला गोब्राह्मण प्रतिपालक म्हणायचे यातच सर्व आले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) माणसांच्या राजाला धर्माचा राजा करून भांडणे करू नका. कष्टाळू हेच सर्वश्रेष्ठ आहेत; मात्र शब्द विकणार्यांना अस्पृश्य समजले पाहिजे. (जातीयवादी कुंभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आमचे पितर ऐवढे नालायक आहेत का, की त्यांना स्वर्ग न मिळता ते पितृलोकात कायम खितपत पडले आहेत ?
५. कोल्हापूरच्या देवीला ब्राह्मणांनी महालक्ष्मी केले ती खरी अंबाबाई आहे.
६. धर्मसत्तेला वा अर्थसत्तेला घटनेने व्यासपीठ ठेवलेले नाही.
म्हणे ‘देशात सध्या देवा-धर्माच्या नावाखाली धार्मिक गुलामगिरीचे वातावरण !’- राजा शिरगुप्पे
सध्याचे विज्ञानयुग आहे. जो संगणक तुम्ही तुमच्या हाताने सिद्ध केला. त्याची फुले वाहून पूजा कसली करता ? (प्रत्येकात देव पहाणे ही भारतीय संस्कृती आहे. अशा विविध प्रकारच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांमुळेच अखिल विश्वातून जिज्ञासू भारताकडे आकर्षित झाले आहेत. डोळ्यांवरील हिंदुद्वेषाचा चष्मा काढून याकडे पाहिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आपल्याकडे विचित्र समाजव्यवस्था निर्माण झाल्याने आपल्यावर गुलामीचे संस्कार झाले आहेत. (हा इंग्रज, राजकारणी आणि हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या तथाकथित लेखकांनी निर्माण केलेला बागुलबुवा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धार्मिक ग्रंथांमुळे मनुष्याची वैचारिक क्षमता नष्ट झाली आहे. मनुस्मृतीने महिलांना केवळ हीन दर्जा दिला असे नाही, तर सर्वांनाच गुलाम बनवले आहे. सध्या देशात देवा-धर्माच्या नावाखाली धार्मिक गुलामगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे. (मग कुंभार यांनी खुशाल देश सोडून जावे; म्हणजे अन्य देशातील गुलामगिरी त्यांना लक्षात येईल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात