अयोध्या : भगवान श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत आले होते. त्या वेळी भव्यदिव्य स्वरूपात दिवाळी साजरी झाली होती. तशीच भव्य आणि दिव्य स्वरूपातील दसरा अन् दिवाळी यावर्षी अयोध्येत साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. सरकारकडून आर्थिक साहाय्य न मिळाल्याने २ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी झाली नव्हती.
यंदा दसर्याला अयोध्यानगरी लाखो दिव्यांनी उजळणार आहे, तर दिवाळीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याला मोठ्या संख्येने साधू-संत उपस्थित रहाणार आहेत. ‘शरयू घाटाजवळील सर्व इमारतींवर दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे आणि त्याची सिद्धताही चालू झाली आहे. अयोध्या पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, हा कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश आहे’, असे एका अधिकार्याने सांगितले. (अयोध्या हे पर्यटनस्थळ नसून ते हिंदूंचे धार्मिक स्थान आहे, हे योगी आदित्यनाथ सरकारने हिंदूंना आणि जगाला सांगितले पाहिजे अन् त्या दृष्टीने त्याचा विकास केला पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)