Menu Close

प्रेमसंबंध तोडल्यामुळे धर्मांध युवकाची सावंतवाडी येथील हिंदु युवतीला आणि तिच्या आईला मारण्याची धमकी

धर्मांध युवकाला अटक आणि जामिनावर सुटका

लव्ह जिहाद आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही फोफावतोय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

सावंतवाडी : शहरातील एका हिंदु युवतीने २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडल्याचा राग धरून करवीर, येथील एका धर्मांध युवकाने त्या युवतीला भ्रमणभाषवरून, माझ्याशी विवाह कर, अन्यथा ५० सहस्र रुपये दे नाहीतर तुझ्या आईला मारणार, अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता युवतीच्या मनात लज्जा निर्माण होईल असे आणि मारण्याच्या धमकीचे लघुसंदेश भ्रमणभाषद्वारे पाठवले. (धर्मांधांचा उद्दामपणा आणि असहिष्णुता यातून दिसून येते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे घाबरलेल्या युवतीने येथील पोलीस ठाण्यात त्या धर्मांध युवकाच्या विरोधात तक्रार दिली. (हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्यानेच त्या धर्मांधांच्या लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडतात. त्यामुळे त्यांच्यावर एकतर आयुष्यभर धर्मांधाची गुलामगिरी करणे किंवा आपला जीव गमावणे, असे दोनच पर्याय रहातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी युवकाला पोलीस कोठडी झाली होती. या पोलीस कोठडीची मुदत २८ सप्टेंबरला संपल्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने धर्मांध युवकाची जामिनावर सुटका केली.

हिंदु युवती आणि धर्मांध आरोपी जुल्फाम उपाख्य भोल्या सलीम कच्छी (वय २८ वर्षे), हरिप्रिया हाऊसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर, तालुका करवीर, कोल्हापूर यांचे मागील २ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मागील ६ मासांपासून जुल्फाम युवतीला भ्रमणभाषवर संपर्क करायचा; मात्र ती भ्रमणभाष घेत नव्हती, तसेच पूर्वीप्रमाणे त्याच्याशी बोलतही नव्हती. त्यामुळे रागाने दारूच्या नशेत जुल्फाम याने त्याच्या मित्राच्या भ्रमणभाषवरून युवतीला धमकी दिली होती. मी तिला अ‍ॅसिड टाकून मारण्याची धमकी दिलेली नाही, तसेच तिच्याकडे पैशांची मागणी केलेली नाही किंवा तसा कोणताही प्रयत्न केलेला नाही, असे जुल्फाम याने पोलिसांना सांगितले. (चोर कधी स्वतःहून चोरी केल्याची स्वीकृती देतो का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

ही घटना एप्रिल २०१७, तसेच ११ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर या कालावधीत हिंदु युवती सावंतवाडी येथे असतांना घडली. हिंदु युवतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला २७ सप्टेंबरला अटक केली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *