भोर : नवरात्रोत्सवानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने गेल्या ३२ वर्षांपासून श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात येते. २५ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भोर (जिल्हा पुणे) आणि शिरवळ (जिल्हा सातारा) येथे श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. दौडीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या, तसेच ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात येत होते.
शिरवळ
येथे समितीच्या सौ. गौरी बोराटे आणि सौ. रुक्मिणी जाधव यांनी ध्वजाचे पूजन करून औक्षण केले. या वेळी सर्वश्री चिराल चव्हाण, प्रशांत रेवडीकर, सूरज चव्हाण, अभिजित थोपटे, अरुण कुचेकर, बंडू भिसे, सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव आणि समितीचे श्री. श्रीकांत बोराटे यांच्यासह २५० हून अधिक धारकरी उपस्थित होते.
भोर
येथील श्री विठ्ठल मंदिर, भेलकेवाडी या ठिकाणीही समितीच्या सौ. रुक्मिणी जाधव, सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. रुपाली तांबे, सौ. रेखा भेलके यांनी ध्वजाचे पूजन करून स्वागत केले. या वेळी सर्वश्री आकाश बुदगुडे, धनंजय पवार, निलेश आवाळे, अक्षय शेटे, सचिन देशमुख, निलेश शेटे आणि सनातन संस्थेचे श्री. विठ्ठल जाधव यांच्यासह ३५ धारकरी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात