कोल्हापूर : येथील शनिवार पेठ भागात २७ सप्टेंबरला श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्री दुर्गा दौडीचे आयोजन केले होते. सकाळी ७.३० वाजता सोन्या मारुति चौक या ठिकाणाहून दौडीला प्रारंभ करण्यात आला. संत राजयोगी श्री गजानन महाराज यांच्या समाधी मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली. या दौडीत हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला होता.
या वेळी श्री दुर्गादेवी आणि संत गजानन महाराज यांची आरती करण्यात आली. त्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख श्री. शरद माळी यांनी उपस्थितांना श्री दुर्गादौडीचे आणि हिंदूंनी एकत्र येण्याचे महत्त्व या विषयावर माहिती दिली. या वेळी शहर कार्यवाहक
श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री किरण दुसे, शिवानंद स्वामी, सुधाकर सुतार यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.
क्षणचित्र
श्री दुर्गादौडीमध्ये असलेल्या भगव्या ध्वजाच्या स्वागतासाठी जागोजागी महिलांनी रांगोळी काढली होती, तसेच ठिकठिकाणी ध्वजाचे पूजन करण्यात आले.
रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भाविकांसाठी देवीपूजनाचे शास्त्र या विषयावर प्रवचन
या दिवशी शाहूकालीन श्री अंबाबाई मंदिर इंदुमती रानी सरकार पार्क (अम्बाई नगर) येथे समितीच्या वतीने भाविकांसाठी धर्मप्रेमी श्री. बालकृष्ण पाटील यांच्या पुढाकाराने देवीपूजनाचे शास्त्र या विषयावर प्रवचन घेतले. या वेळी उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे यांनी देवीच्या जपाचे महत्त्व, नवरात्र उत्सवाचे महत्त्व, तसेच अन्य धार्मिक कृती यांच्याविषयी माहिती दिली. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री महेश वाशिकर, संतोष वाशिकर, प्रवीण वाशिकर, संजय चौगुले, संग्राम थोरात, प्रकाश लाड, राजू लोहार, सुरेश शेटके, निलेश गिरी यांसह २५०हून अधिक भाविक उपस्थित होते. प्रवचनानंतर उपस्थित महिलांनी श्री दुर्गादेवीच्या छायाचित्रावर कुंकूमार्चन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात