- हिंदु संघटना लव्ह जिहादचा विरोध करत आहेत; मात्र केंद्र सरकारला अशा फसवणुकीच्या घटना रोखण्यात याव्या यासाठी काही करावे, असे का वाटत नाही ?
- हिंदूंना केवळ विकास हवा आहे, असे नाही, तर हिंदूंचे आणि त्यांच्या धर्माचे रक्षणही व्हावे, अशीच त्यांची सरकारकडून अपेक्षा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मेरठ (उत्तरप्रदेश) : मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांनी न्यायालयात जाऊन नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याची घटना नुकतीच येथे घडली.
१. शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वीच करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयात झालेल्या विरोधाची माहिती मिळाल्यावर फरीदाबाद पोलिसांनी येथे येऊन मुलीला कह्यात घेतले.
२. न्यायालयात एक तरुणी बुरखा घालून विवाहासाठी मुसलमान तरुणासमवेत आली असून ती हिंदु आहे, अशी माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर त्यांनी येथे येऊन विरोध चालू केला होता.
३. बजरंग दलाचे संयोजक बलराज डूंगरपूर म्हणाले की, हे लव्ह जिहादचे प्रकरण आहे. मुलीला बुरख्यामध्ये आणण्यात आले, याचाच अर्थ तिचे धर्मांतर करण्यात आले आहे. मुसलमान युवक हिंदु तरुणींना षड्यंत्राद्वारे लक्ष्य करतात. आमची मागणी आहे की, देशात हिंदु तरुणींच्या नोंदणी विवाहावर बंदी घालण्यात यावी.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात