भाजपची सत्ता असणार्या हरियाणामध्ये गोतस्करी होते, हे पोलिसांना नाही, तर महिलांना लक्षात येते, हे लज्जास्पद ! आम्ही गोरक्षण करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, अशा शासनाच्या वृत्तीमुळेच गोतस्करांचा उद्दामपणा वाढला आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
गुरुग्राम (हरियाणा) : ब्रिटीश नागरिक असलेल्या सोनिया शर्मा आणि त्यांची मैत्रीण आर्ची बारानवाल यांच्यावर हरियाणातील सोहाणा रोड, गुरुग्राम येथे गोतस्करांनी आक्रमण केले. या वेळी गोतस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांच्या चारचाकी वाहनावर जिवंत गाय फेकली. या प्रकरणी सोहाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सोनिया शर्मा आणि आर्ची बारानवाल त्यांच्या चारचाकी वाहनाने मेवातकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी गोवंश घेऊन जाणारा पिकअप ट्रक (आर्जे ३२ जीए २३०३) पाहिला. त्यात अनेक गोवंश दाटीवाटीने कोंबले होते. ज्या क्रूर स्थितीत गोवंश ठेवण्यात आले होते, ते पाहून या महिलांनी या गाडीला थांबवण्याचा संकेत दिला; मात्र ट्रकची गती न्यून करण्याऐवजी गोतस्करांनी या महिलांवर गोळीबार केला.
सुदैवाने महिलांना गोळी लागली नाही; तरीही त्यांनी ट्रकचा पाठलाग करणे चालूच ठेवले. या रणरागिणींनी पोलिसांनाही त्याविषयी माहिती दिली. गाडी अजूनही पाठलाग करत असल्याच्या कारणावरून ट्रकमधील एका तस्कराने महिलांच्या वाहनावर एक जिवंत बांधून ठेवलेली गाय टाकली. हे प्राणघातक आक्रमण चुकवण्यात त्या यशस्वी ठरल्या. यात गाय रस्त्यावर पडून घायाळ झाली. शेवटी गोतस्करांनी ते वाहन सोडले आणि ते पळून गेले. पोलिसांनी रस्त्यावर पडलेल्या आणि गंभीर घायाळ झालेल्या २ गायी आणि इतर ४ घायाळ गोवंश जप्त केले. महिलांवर केलेल्या गोळीबारात वापरलेले शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. (या महिलांनी केलेेले धाडस अभिनंदनीय आहे ! गोरक्षकांना समाजकंटक म्हणणारे गोतस्करांकडून सातत्याने होणार्या गोळीबाराविषयी आणि गोेहत्यांविषयी कधीच बोलत नाहीत कि त्यांच्यावर कठोर कारवाई करत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात