जकार्ता (इंडोनेशिया) : इंडोनेशियाच्या बाली बेटावरील अगुंग पर्वतावर ज्वालामुखी फुटण्याची शक्यता असल्याने त्याला शांत करण्यासाठी येथील हिंदूंनी पूजा-अर्चना चालू केली आहे. गेल्या ५० वर्षानंतर पहिल्यांदाच हा ज्वालामुखी फुटणार आहे. अगुंग पर्वतावर बालीतील सर्वात मोठा जिवंत ज्वालामुखी आहे. त्याच्या १९६३-६४ मध्ये झालेल्या उद्रेकात १ सहस्र ७०० लोक मृत्युमुखी पडले होते. ज्वालामुखी फुटेल या भीतीने आतापर्यंत सवा लाख लोकांनी घर सोडून दुसर्या ठिकाणी स्थलांतर केले आहे; मात्र अनेक जण अद्यापही ज्वालामुखी शांत होऊन परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा विश्वास असल्याने तेथेच थांबले आहेत.
एका स्थानिक हिंदूने सांगितल्यानुसार लोक ज्वालामुखीची पूजा करत आहेत. अंगुग पर्वत लवकरच शांत होईल, असा विश्वास लोकांनी व्यक्त केला आहे. आता देवच आपल्याला या परिस्थितीमधून वाचवेल, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात