भारतात रोहिंग्या आतंकवाद्यांना आश्रय देण्याची मागणी करणार्यांनाही भारताने असेच हाकलायला हवे, असे राष्ट्रप्रेमींना वाटेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी देहली : भारतातील लक्ष्मणपुरी येथील धर्मांध सुन्नी धर्मगुरु सलमान नदवी याला ओमानने हाकलून लावले आहे. मस्कत येथे एका व्याख्यानात त्याने सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांवर आक्रमण करण्याचे ओमानला आवाहन केले होते. या देशांकडून आतंकवाद आणि इराण यांचे समर्थन केल्यावरून कतारवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच त्याच्याशी राजनैतिक आणि व्यावसायिक संबंध तोडले आहेत. त्याचा विरोध करण्यासाठी नदवी याने हे आवाहन केले होते. मस्कतच्या शरीया विज्ञान महाविद्यालयात हे व्याख्यान देण्यात आले होते. नदवी याच्या हकालपट्टीवरून सौदी अरेबियाने ओमानचे अभिनंदन केले आहे.
१. नदवी याची हकालपट्टी करण्यात आल्यावर तो कतारमध्ये गेला आहे. कतारमधील ९१ वर्षीय धर्मगुरु युसूफ अल करजावी याच्यासमवेत त्याला पहाण्यात आले आहे. करजावी याच्यावरही आतंकवाद्यांचे समर्थन केल्यावरून सौदी अरेबियाने बंदी घातली आहे. करजावी याने आत्मघाती आक्रमणाला जिहादचे सर्वोच्च रूप असे म्हटले आहे.
२. नदवी याने वर्ष २०१४ मध्ये इसिसचा प्रमुख अबू बकर अल् बगदादी याला पत्र लिहून मोसुलच्या मशिदीतून खिलाफतची घोषणा केल्यावरून त्याचे अभिनंदन केले होते. तेव्हा सुरक्षा यंत्रणांनी त्याची चौकशी केली होती. तेव्हा बगदादीला भारताशी चांगले संबंध ठेवणे आणि आतंकवाद नष्ट करण्यास सांगितले, असे नदवीने सांगितले होते. (नदवी याच्यावर त्याच वेळी कारवाई करून त्याला कारागृहात डांबायला हवे होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. नदवी याने सौदी अरेबियाला सर्व आंतरराष्ट्रीय जिहादी संघटनांचा एक संघ बनवण्याचेही आवाहन केले होते. तसेच भारत आणि शेजारी देशांतून ५ लाख मुसलमान तरुणांची इस्लामी सेना बनवण्याचाही सल्ला दिला होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात