जळगाव : महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध केले. त्याचप्रमाणे आजही महिलांना हातात शस्त्र घेण्याची वेळ आली आहे. शील रक्षण करण्यासाठी आणि लव्ह जिहाद मुळापासून नष्ट करण्यासाठी हिंदु भगिनींनी दुर्गादेवी होणे काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांडे यांनी केले. येथील रावेर तालुक्यातील मस्कावद, येथे नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने छोट्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश मराठे यांनी केले, तर सभेला २०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. सभेनंतर ग्रामस्थांनी एकत्र येऊन निर्धार केला की, या गावात कोणत्याही प्रकारची धर्महानी होऊ देणार नाही आणि कुणालाही धर्मांतरणाला बळी पडू देणार नाही.
२. उपस्थित काही मुलींनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची मागणी केली.
३. धर्माचरणाचे महत्त्व लक्षात आल्याने ग्रामस्थांनी सिद्धता दर्शवत गावातच नियमित वर्गाची मागणी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात