सोलापूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
सोलापूर : ममता बॅनर्जी सरकारने मोहरमचे कारण पुढे करत श्रीदुर्गा विसर्जनावर एक दिवसाची बंदी घातली, हे वृत्त पाहून मी भारतात आहे कि पाकिस्तानात ?, असा प्रश्न पडला. ममता सरकारला न्यायालयाने फटकारले असूनही एका विशिष्ट धर्मियांना आनंदी ठेवण्यासाठी, तसेच मतांसाठी त्यांचे लांगूलचालन चालू आहे. मी ममता बॅनर्जीचा जाहीर निषेध करतो. देव त्यांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना, असे विधान येथील भाजपचे नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले यांनी केले. येथील जिल्हा परिषद प्रवेशद्वार येथे आयोजित राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ते बोलत होते. आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या अन्य कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
गोरक्षक श्री. अभय कुलथे, यशपाल चितापुरे, तिरुमल श्रीराम, विजय यादव, प्रमोद चिंचोलकर, मंदार चितापुरे, दत्ता धनके, देविदास वडलाकुंडा, भूमेश कोमटेली, विलास पोतु यांसह अनेक कार्यकर्ते आंदोलनाला उपस्थित होते.
न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा नोंद करा ! – प्रमोद सलगर
न्यायालयाने ममता सरकारला फटकारले असूनही न्यायालयाचा आदेश झिडकारून बंगाल पोलिसांनी मोहरमपूर्वी श्रीदुर्गा विसर्जन पूर्ण करण्याविषयी आदेश दिले आहेत. यासाठी संबंधितांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात