Menu Close

अमेरिकेतील लास वेगासमधील संगीतरजनीमध्ये झालेल्या गोळीबारात ५० जण ठार

लास वेगास (अमेरिका) : येथील सनसेट स्ट्रिप परिसरातील मँडले बे रिसॉर्टच्या जवळ चालू असलेल्या संगीतरजनीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात ५० जण ठार, तर २०० जण घायाळ झाले आहेत. घायाळांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे आतंकवादी आक्रमण होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आक्रमणकर्त्याला ठार केले आहे; मात्र त्याचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही.

आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्‍या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले. त्याच्या अन्य एक महिला साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *