-
हिंदु जनजागृती समितीकडून भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि गरोठ येथे प्रशासनाला निवेदन
-
हिंदु सणांच्या काळात दक्षिण पूर्व विभागीय रेल्वेस्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांच्या मूल्यात केलेली वाढ रहित करावी !
भोपाळ : सुप्रसिद्ध मैहर (मध्यप्रदेश) आणि विंध्यांचल (उत्तरप्रदेश) येथे प्रतिवर्षी होणार्या नवरात्रीनिमित्ताने होणार्या यात्रेच्या यात्रेकरूंवर रेल्वे प्रशासनाने रेल्वे तिकिटावर अधिभार लावला, तसेच दक्षिण पूर्व विभागीय रेल्वे स्थानकांवर हिंदूंच्या सणांच्या काळात प्लॅटफॉर्म तिकिटांच्या मूल्यात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. हा धार्मिक भेदभाव आहे. असे निर्णय घेणार्या अधिकार्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी समितीने भोपाळ, उज्जैन, इंदूर आणि गरोठ येथील प्रशासनाला निवेदन देण्यात आले. उज्जैन येथील रेल्वे व्यवस्थापकांनाही निवेदन देण्यात आले.
भोपाळ येथे अप्पर जिल्हाधिकारी श्री. डी.पी. माली यांना निवेदन देतांना येथील रणरागिणी शाखेच्या सौ. संध्या आगरकर, श्रीमती पंकज सोम आणि सौ. शिल्पा अरमरकर उपस्थित होत्या. उज्जैन येथे अप्पर जिल्हाधिकारी श्री. बसंत कुर्रे यांना निवेदन देतांना श्री. योगेश व्हनमारे, श्री. किशोर कुलकर्णी, सौ. किरण कुलकर्णी आणि श्री. आनंद जाखोटिया आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. गरोठ (जिला मंदसौर) येथे समितीच्या वतीने श्री. शिवम् सोनी आणि श्री. रवि भलवारा यांनी उपविभागीय दंडाधिकारी श्री. रामप्रसाद वर्मा यांना निवेदन दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात