विटा (जिल्हा सांगली) येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन
विटा : सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केरळमधील एका प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ आहे काय, याची चौकशी करण्याचे आदेश ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ (एन्.आय्.ए.) ला दिले. सर्वोच्च न्यायालयाने ‘लव्ह जिहाद’ या विषयात लक्ष घातले आहे, यातून हा विषय अत्यंत संवेदनशील, गंभीर आणि महत्त्वाचा आहे. भारतात ‘लव्ह जिहाद’ला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे. तरी ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, उत्तर प्रदेश शासनाच्या ‘अँटी रोमियो स्क्वॉड’च्या धर्तीवर प्रत्येक राज्यात विशेष दलाची स्थापना करावी आणि या समस्येविषयी प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केली.
२८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता चौंडेश्वरी मंदिरानजिक राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनासाठी २५ हून अधिक धर्माभिमानी हिंदूंची उपस्थिती होती. या वेळी हिंदु धर्मसेनेचे संस्थापक श्री. शिव शिंदे, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. राहुल कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. या वेळी केंद्र सरकारने बंगाल येथे श्रीदुर्गा मूर्तीविसर्जनावर घातलेली बंदी त्वरित उठवावी आणि ममता सरकारला याचा जाब विचारावा, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनासाठी हिंदु धर्माभिमानी सर्वश्री धनाजी कदम आणि यशोधन कदम उपस्थित होते. सौ. वीणा कदम यांनी सूत्रसंचालन केले.
विशेष
आंदोलनासाठी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी आंदोलन पाहून एक नागरिक उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी घेणार्यांसमवेत सहभागी झाले आणि त्यांनीही स्वाक्षरी घेतांना सहकार्य केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात