Menu Close

एकविरा देवी मंदिराचा सोनेरी कळस चोरीला

लोनावळा : कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिरावरचा कळस चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या कळसाला सोन्याचा मुलामा होता. या घटनेमुळे देवी भक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

काल मध्यरात्री ही घटना घडली. एका भक्ताने हा सोन्याचा मुलामा असलेला कळस देवीला अर्पण केला होता. हा कळस साधारण १ लाख २५ हजार रूपये किंमतीचा होता. पहाटे कळस चोरील गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.

मंदिराच्या कळसावर सीसीटीव्ही यंत्रणा आहे. तसेच दोन पोलीस कर्मचारी व देवस्थानचा एक कर्मचारी रात्रभर तेथे सुरक्षेसाठी तैनात असताना ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी देवीची नवरात्र यात्रा व महानवमी होम संपन्न झाला होता.

संदर्भ : मटा

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *