लव्ह जिहादविषयी जागृती करणार्या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नागपूर : तरुणी आणि महिला मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादच्या जाळ्यात फसत आहेत. एकट्या केरळमध्ये ४५५ तरुणी लव्ह जिहादमध्ये अडकल्या आहेत. वैद्यकीय, आयआयटीचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात भारतविरोधी कारवायांमध्ये गुंतले असून त्यांना वेळीच सावध करून परत आणण्याची आवश्यकता आहे. हे करण्यासाठी देशभक्त आणि जागरूक नागरिकांनी पुढे यायला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले आहे. रेशीमबाग मैदानावर राष्ट्र सेविका समितीच्या नागपूर विभागाच्या विजयादशमी उत्सवाच्या वेळी बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की,
१. भारतीय तंत्रज्ञान संस्थांसारख्या (आयआयटी) नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये बीफ फेस्टीव्हल आयोजित करणे, हैदराबादच्या महाविद्यालयामध्ये गणेशोत्सवात गणेशपूजेला विद्यार्थ्यांकडून नकार येणे म्हणजे भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा अपमान आहे.
२. कुटुंबांमध्ये असलेल्या संस्कारांच्या न्यूनतेमुळे समाजात अशी अराजकता, अधर्म माजत आहे. आपला धर्म, संस्कृती, परंपरा यांचे रक्षण करायचे असेल, तर मातृशक्तीने आणि समाजसेवी संस्थांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. आसुरी प्रवृत्तींचा प्रतिबंध करून दैवी शक्तींना प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
लव्ह जिहादच्या भीषणतेची लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. हा ग्रंथ तुम्ही स्वत: वाचा तसेच इतरांनाही या ग्रंथाबद्दल सांगा !