चेन्नई : अरुंबक्कम् येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. या वेळी समितीच्या सौ. सुधा गोपालकृष्णन् यांनी नवरात्रोत्सव तसेच नामजप यांविषयीचे महत्त्व विषद केले.
सौ. सुधा गोपालकृष्णन् ह्या कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी अरुंबक्कम् येथील श्री पंचालीअम्मा मंदिरासमोर पतीची वाट पहात उभ्या होत्या. तेव्हा त्यांना मंदिरात भजनाची सिद्धता चालू असलेली दिसली. त्यानंतर त्यांनी त्वरीत मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी चर्चा करून नवरात्रोत्सवाविषयी माहिती सांगण्याची अनुमती मिळवली आणि तेथे उपस्थित भाविकांना उत्स्फूर्तपणे नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
अरुंबक्कम् (चेन्नई) येथे नवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीतर्फे व्याख्यान
चेन्नई : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अरुंबक्कम् येथील सौ. कर्पगमा अॅन्टनी यांच्या निवासस्थानी नवरात्रीनिमित्त नुकतेच व्याख्यान घेण्यात आले. सौ प्रफुल्ल रामचंद्रन् यांनी या व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी सौ. सुगंधी जयकुमार यांनी नवरात्रोत्सव, नामजप इत्यादींविषयीचे महत्त्व विषद केले. या वेळी श्री. जयकुमार उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ २५ हून अधिक महिला भाविकांनी घेतला.
क्षणचित्रे
१. सौ. कर्पगमा अॅन्टनी यांचे पती ख्रिस्ती आहेत; मात्र ते त्यांच्या पत्नीला हिंदु धर्मातील पूजा-अर्चा करण्यास सहकार्य करतात.
२. उपस्थितांनी नियमित सत्संग आयोजित करण्याविषयी इच्छा व्यक्त केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात