Menu Close

साधूसंतांच्या पवित्र भूमित होणारा ‘सनबर्न फेस्टिव्हल’ रद्द व्हावा – माजी नगरसवेक मारुती भापकर यांची मोहन भागवत यांच्याकडे मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात आयाेजित ‘सनबर्न म्युझिक फेस्टिव्हल’ रद्द व्हावा, म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना निवेदनाद्वारे माजी नगरसवेक मारुती भापकर यांनी मागणी केली आहे.

सरसंघचालक भागवत यांना भापकर पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण विजयादशमीनिमित्त संपूर्ण देशाला नागपूर (रेशीम बाग) येथून संबोधित करताना आमच्या युवक युवतीच्या मनावरून विदेशी संस्कृतीचा प्रभाव दूर करायला हवा, असे सांगितले. तर, दुसऱ्या बाजूला संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपरी-चिंचवडच्या पुण्यभूमीत पाश्चिमात्य संस्कृतीने व्यापलेल्या ‘सनबर्न म्युझिक फेस्टिवल’चे मोशी येथे आयोजन करण्यात येणार आहे. याची सोशल मीडियावर जाहिरात आणि ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातील लाखो युवक युवती सहभागी होणार आहेत.

‘या नियोजनामध्ये महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विभाग व काही स्थानिक भाजप नेते सहभागी आहेत. अशा कार्यक्रमांना तरुणांची मोठी गर्दी असते; मात्र साधू-संतांच्या परिसरात अशा प्रकारचे फेस्टिव्हल ठेवून संस्कृती विरुद्ध काही तरी करण्याचा आयोजकांचा डाव आहे. या फेस्टिव्हलची सोशल मीडियावर जोरात जाहिरात सुरू असून, ठिकठिकाणी तिकीट उपलब्ध आहेत. डिसेंबरमध्ये होणाऱ्या या फेस्टिव्हलसाठी तरुणांमध्ये आतापासूनच उत्साह दिसत आहे. ही भूमी साधूसंतांची, शूरवीरांची असून टाळ मृदंगाच्या आवाजात नादमय होण्याच्या भूमीत काही दिवसांत पॉप संगीताच्या तालावर मद्यधुंद अवस्थेत तरुणतरुणी थिरकणार आहे. ही या भूमीची, परंपरेची, संस्कृतीची, शोकांतिका आहे. देशातील युवाशक्ती हीच देशाची खरी शक्ती आहे. त्याच जोरावर भारत महासत्ता होऊ शकतो. त्याच युवक युवतीच्या समोर महाराष्ट्र शासन काय आदर्श उभा करू इच्छिते? अशा कार्यक्रमामुळे समाजावर नेमके कुठले संस्कार सरकार करू इच्छिते,’ असा प्रश्न भापकर यांनी उपस्थित केला आहे.

त्यामुळे आपण विजयादशमीच्या (दसरा) दिवशी केलेल्या वक्तव्याच्या विसंगत अशी भूमिका महाराष्ट्र शासन (पर्यटन ) विभागाने घेतली आहे. पर्यटन विभागाने ‘सनबर्न म्युझिक फेस्टिवल’ आयोजनात सहभागी होऊन पुढाकार घेऊन हा कार्यक्रम करू पाहत आहे. तरी, आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे व पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांना हा कार्यक्रम रद्द करण्याची सूचना करावी,’ अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

संदर्भ : मटा

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *