अमरावती येथे निवेदनांद्वारे मागणी
अमरावती : आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे. लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी केंद्र आणि राज्य स्तरावर पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी, तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्राथमिक शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी यांसाठी अनधिकृतरित्या घेण्यात येणारा वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प त्वरित थांबवावा, या मागण्यांचे निवेदन येथील अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी यांनी हिंदु जनजागृती समिती, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु महासभा, श्री योग वेदांत सेवा समिती या संघटना, तसेच शिवसेना पक्ष यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी विषय समजून घेऊन ही अतिशय चिंतेची गोष्ट असून मी वरिष्ठांसमवेत याविषयी लवकरच चर्चा करतो, असे सांगितले. निवेदन दिल्यावर उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) बोलके म्हणाले, अद्यापपर्यंत अमरावती येथे अंनिसचे असे कार्यक्रम झालेले नाहीत. यापुढे असा प्रस्ताव आल्यास आम्ही त्याला अनुमती देणार नाही.
या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख श्री. नरेंद्र केवले, हिंदु महासभेचे श्री. नितीन व्यास, श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अभिषेक दीक्षित, श्री. करण धोटे, श्री अजिंक्य कठगळे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांसह एकूण १५ जण उपस्थित होते.
क्षणचित्र
सिटी न्यूज या वृत्तवाहिनीने समितीच्या कार्यकर्त्याची मुलाखत घेऊन निवेदन देऊन थांबू नका, तर याविषयी आंदोलन करा, असेही सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात