-
१५६ वर्षांची परंपरा मोडल्यामुळे ग्रामस्थ संतप्त
-
मूक मोर्चा आणि दिवसभर रोहे बंद आंदोलन करून निषेध
मशिदींवरील अनधिकृत भोंग्यावर कारवाई करण्यास न धजावणारे पोलीस हिंदूंच्या परंपरा मोडण्यास मात्र मर्दुमकी दाखवतात ! अशा पोलिसांवर कारवाई होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नशील रहावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
रोहे (जिल्हा रायगड) : १५६ वर्षांची दैदीप्यमान परंपरा आणि हिंदु एकतेचे प्रतीक असलेले रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज पालखी सोहळ्यात, १ ऑक्टोबरला पोलिसांनी अचानक रात्री ११.३० वाजता येऊन पारंपरिक वाद्य वाजवण्यावर आक्षेप घेतला आणि पालखी थांबवली. यामुळे रोहे येथील ग्रामस्थ आणि आणि श्री धावीर महाराज यांचे भक्तगण संतप्त झाले आणि ४ ऑक्टोबरला रोहे बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ आणि भक्त यांनी रस्त्यावर उतरून पोलिसांच्या दंडेलशाहीचा निषेध केला, तसेच राम मारुती चौक येथून मूकमोर्चा काढून तहसीलदारांना निषेध पत्र दिले.
१. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा प्रतीवर्षी पालखी सोहळा साजरा करण्यात येतो.
२. या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवण्याची १५६ वर्षांची प्रथा आहे.
३. १ ऑक्टोबरला पालखी सोहळ्यात वाद्य वादन चालू असतांना पोलिसांनी वाद्य वादनाला विरोध केला. (शांततेत चालणार्या हिंदूंच्या वाद्य वादनाला पोलिसांचा आक्षेप का ? कि जाणूनबुजून हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचा त्यांचा हेतू आहे याची चौकशी करावी. – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात