• विदेशातील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवले जाते, तर भारतातील विद्यार्थ्यांना मोगल आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो ! भारतासाठी हे लज्जास्पद ! जे आपण शिकतो, तसेच आपण घडतो, हे सरकारला लक्षात कसे येत नाही ?
• भारतात रामायण आणि महाभारत शिकवण्यास ‘शिक्षणाचे भगवेकरण’ ठरवणार्या भारतातील हिंदुद्वेष्ट्यांना सणसणीत चपराक !
नवी देहली : भारतीय संस्कृती जगात वेगाने फोफावत आहे. एवढेच नव्हे, तर अन्य धर्मीयही आता याकडे वळू लागले आहेत. आता हिंदु धर्मातील महाभारत आणि रामायण हे महान ग्रंथ जगातील श्रेष्ठ अशा अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापिठात शिकवले जाणार आहेत. ही गोष्ट हिंदूंसाठी अभिमानास्पद समजली जात आहे.
हा अभ्यासक्रम शिकवणार्या प्राध्यापक मोनियस म्हणाल्या, ‘‘रामायण आणि महाभारत हे ग्रंथ प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतील. या ग्रंथांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हिंदु संस्कृतीच्या प्रत्येक पैलूविषयी माहिती मिळणार आहे.’’ (पाश्चात्त्य संस्कृतीचा उदोउदो करून हिंदु संस्कृतीला तुच्छ लेखणार्यांना सणसणीत चपराक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अनुमाने २५ सहस्र श्लोकांची रामायण कथा ७ स्कंदांमध्ये विभाजित आहे, तर १ लाख छंद आणि १८ खंड असलेले महाभारत हे विश्वातील सर्वांत मोठे महाकाव्य आहे. श्रीमद् भगवद्गीता ही महाभारताचाच एक भाग आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात