Menu Close

व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित आस्थापनाकडून श्रीगणेशाचे विडंबन !

‘एसकलर तिएंडा’ने संकेतस्थळावरील ‘श्रीगणेश क्रॅश-पॅड’ची विक्री थांबवण्याची हिंदूंची मागणी

नेवाडा (अमेरिका) : व्हॅलेन्शिया (स्पेन) स्थित ‘एसकलर तिएंडा’ या आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरून चालू असलेली श्रीगणेशाची प्रतिमा छापलेल्या क्रॅश-पॅडची विक्री थांबवावी, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.

‘स्वत:च्या आर्थिक लाभासाठी हिंदूंच्या देवतेचा वापर करणे अयोग्य आहे. यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत’, असे अमेरिकेतील हिंदु नेते श्री. राजन झेद यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ‘एसकलर तिएंडा’ने ‘श्रीगणेश क्रॅश-पॅड’ची विक्री थांबवावी आणि हिंदूंची क्षमायाचना करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *