यासंदर्भात महानगरपालिकेला काय म्हणायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीतील चौकात आणि रस्त्याच्या कडेला न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवून वाढदिवस आणि उत्सव यांच्या शुभेच्छांच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात फलक लावले जातात; मात्र पालिकेच्या अधिकार्यांकडून अनधिकृत फलक लावणार्यांवर ठोस कारवाई केली जात नाही. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात भर पडते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रार्थनास्थळांवर कारवाईची तत्परता दाखवणारे अधिकारी शहर विद्रूप करणार्या अनधिकृत फलकांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते, असा आरोप भाजपचे आमदार श्री. गणपत गायकवाड यांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात