Menu Close

सांगली जिल्हा मुस्लिम जमियतकडून मिरज येथील चित्रमंदिराला ‘हलाल’ चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी निवेदन

चित्रपट प्रदर्शित केल्यास परिणामांना उत्तरदायी रहाण्याचीही चेतावणी

याविषयी निधर्मी, पुरो(अधो)गामी, पुरस्कार वापसी करणारे यांना काय म्हणायचे आहे ? कि ते या वेळी मुग गिळून गप्प बसणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात 

सांगली : तीन तलाकच्या प्रथेवर कोरडे ओढणारा आणि अनेक पुरस्कार मिळालेला ‘हलाल’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. सांगली जिल्हा मुस्लिम जमियतने मिरज येथील अमर चित्रमंदिराला ‘हलाल’ चित्रपट प्रदर्शित न करण्याविषयी निवेदन दिले. चित्रपट प्रदर्शित केल्यास होणार्‍या परिणामांना आपणच उत्तरदायी असाल, याची नोंद घ्यावी, अशी चेतावणीही यात देण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, या चित्रपटाची कथा कुराण आणि शरीयतच्या विरोधात आहे. वास्तविक हलालमध्ये मांडण्यात आलेल्या कथेचे कुराण आणि शरियत यांत कोणत्याही प्रकारचे समर्थन करण्यात आलेले नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यास मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. या चित्रपटावरील बंदीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका प्रविष्ट केली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित न करून मुसलमान समाजाला सहकार्य करावे.

२०० चित्रपटगृह चालकांपैकी ४० ते ५० चित्रपटगृह चालकांकडूनच प्रदर्शनासाठी होकार

चित्रपटाचे निर्माते अमोल कागणे यांनी सांगितले, ‘‘महाराष्ट्रात आम्ही २०० चित्रपटगृहांकडे अर्ज पाठवले होते; पण २-३ दिवसांपासून पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा येथील चित्रपटगृहचालकांनी चित्रपटगृह देणार नसल्याचे सांगितले. केवळ ४० ते ५० चित्रपटगृह चालकांनी होकार दर्शवला आहे. चित्रपटगृहाच्या मालकांनी अशी माघार घेतल्यास चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात येईल.’’

साहित्यिक राजन खान यांनी वर्ष १९८१ मध्ये ‘हलाल’ नावाची कथा लिहिली होती. त्यावर आधारित हा चित्रपट आहे. विवाह आणि तलाक यांच्या संदर्भात मुसलमान स्त्रियांचे मत विचारात घेतले जात नसल्याने त्यांच्या भावनांवर होणार्‍या परिणामांचे चित्रण या चित्रपटात केले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *