धर्माभिमानी हिंदूंनी संघटितपणे पुन्हा घुमटीजवळ ध्वज उभारला
पोर्तुगीजकाळातील सालाझारशाहीची आठवण करून देणारे गोवा पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
वास्को : येथील पोलीस वसाहतीजवळील श्री ब्राह्मणदेवाच्या घुमटीजवळ उभारलेल्या भगव्या ध्वजाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली होती. या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेलेल्या हिंदूंना वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली, तसेच पुन्हा भगवा ध्वज लावला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. (भगव्या ध्वजाविषयी पोलिसांना एवढा द्वेष का ? पुन्हा भगवा ध्वज लावल्यास परिणामांची धमकी देणार्या पोलीस निरीक्षकांना गोव्यात पोर्तुगिजांचे राज्य आहे, असे वाटते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस निरीक्षक रापोज तो ध्वज स्वत: येऊन उखडून काढून घेऊन गेले. या घटनेविषयी हिंदूंमध्ये तीव्र पडसाद उमटल्यानंतर हिंदूंनी संघटित होऊन ७ ऑक्टोबर या दिवशी श्री दामोदरदेवाला गार्हाणे घालून ध्वज मिरवणुकीने घेऊन जाऊन त्याची पुन्हा या ठिकाणी स्थापना केली. (वास्को येथील धर्माभिमानी हिंदूंकडून इतरत्रच्या हिंदूंनी बोध घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
सविस्तर वृत्त असे की, श्री ब्राह्मणदेवाच्या घुमटीकडून वास्को येथील प्रसिद्ध श्री दामोदर भजनी सप्ताहासाठी बाजारकर मंडळाचा पार (चित्ररथ) आणि दिंडी यांचा प्रारंभ होतो. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एका भगव्या ध्वजाची दसर्याच्या दिवशी अज्ञाताने विटंबना केली. यानंतर स्थानिक हिंदू या घटनेची वास्को पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेले. या वेळी हिंदूंना पोलीस निरीक्षक रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली. पोलीस निरीक्षक रापोज यांनी स्वत: येऊन तेथील ध्वजही उखडून काढून नेला. (पर्रीकर सरकार या पोलीस निरीक्षकावर कारवाई करणार कि नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच पुन्हा त्या ठिकणी भगवा ध्वज न लावण्याविषयी धमकी दिली. या घटनेचा निषेध करण्यासाठी समस्त हिंदू संघटित झाले. हिंदूंनी ७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता प्रथम वास्को येथील प्रसिद्ध श्री दामोदर मंदिरात जाऊन देवाला गार्हाणे घातले आणि ध्वजाची मिरवणूक काढून त्याची श्री ब्राह्मणदेवाच्या घुमटीच्या जागी स्थापना केली. मिरवणुकीत हिंदूंनी श्री दामोदरदेवाचा जयघोष केला. ध्वजाच्या स्थापनेच्या पूर्वी पंचमोपचार पूजा करून त्याची उभारणी करण्यात आली, तसेच श्री ब्राह्मणदेवाला श्रीफळ आणि पानविडा ठेवून गार्हाणे घालून उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला. घटनास्थळी सुमारे १०० हिंदूंची उपस्थिती होती. (हिंदूंनी संबंधित पोलीस निरीक्षकावर कायदेशीर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला, तरच पुन्हा कोणाचेच असे उद्दाम वर्तन करण्याचे धाडस होणार नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात